१० वी नंतर मी सायन्स साइडला ऍडमिशन घेतलं- सातारकरांच्या लाडक्या YC कॉलेज ला. कॉलेज चालू झालं. माझ्या क्लास डिव्हिजन चा काहीतरी घोळ झाला होता त्यामुळे मी पहिल्या पहिल्यांदा दिसेल त्या अकरावीच्या वर्गात जाऊन बसायचे. तेव्हा अटेन्डन्स घेतली जात नव्हती मग काय सरळ I डिव्हिजनमध्ये जाऊन बसायला लागले. त्या आधी थोडे दिवस बी डिव्हिजन मध्ये बसून पहिल. मला तिथलं शिकवणं फार आवडलं नाही म्हणून I डिव्हिजन! थोड्या दिवसांनी ग्रुपवाईज डिव्हिजन मिळाली- E डिव्हिजन.
(पूर्ण E डिव्हिजनच्या गमती नंतरच्या पोस्ट मध्ये सांगेन).
हा तर मग या नंतर अटेन्डन्स घ्यायला चालू केली आणि रेग्युलर प्रॅक्टिकल्स पण चालू झाले.
आमच्या डिव्हिजन च पहिलं केमिस्ट्री प्रॅक्टिकल मला चांगलं आठवतंय. आम्हाला दिलेल्या कंपाऊंड चा मेल्टिंग पॉईंट काढायचा होता। सरानी सगळं एक्सप्लेन केलं आणि म्हणले करा प्रॅक्टिकल चालू. आमच्या ग्रुपने नुसती capillary भरून ठेवली होती, ना बर्नर चालू केलं होता, ना स्टॅन्ड आणलं होता, ना Theils tube आणली होती. सगळाच आनंदी आनंद! शेवटी शोधाशोध करून सगळं आणलं आणि आमचा एक्सपेरिमेंट चालू झाला एकदाचा.
YC ची केमीस्ट्री लॅब होतीच तेवढी भन्नाट, एक गोष्ट जागेवर दिसेल तर शप्पथ. अर्थात आम्हाला काही सापडायचं नाही. एका केमिकल साठी सगळी आगगाडी लॅब मध्ये फिरायची शेवटी ते सरानाच सापडायचं. H2S हि एक सगळ्यात घाणेरडी गोष्ट होती. ते लागणार असला कि एखादा महाभाग test tube मध्ये H2S ओतून घेऊन बाटली तशीच उघडी ठेवायचा. मग सगळ्या लॅब मध्ये H2Sचा वास दरवळत असायचा (कुजक्या सडक्या अंड्यासारखा). मग कुठूनतरी सरांची स्वारी ओरडत यायची, मग लॅब अससिस्टन्ट जागा व्हायचा आणि H2S च्या बाटली ला टोपण लागायचं!
Qualitative Analysis च्या वेळी सरानी एखादं chemical घ्या असं सांगितलं कि लग्नात शेवटच्या अक्षता पडल्यावर जेवायला धावणारी मंडळी पाहतोय असं वाटायचं. नेमकं आपल्याच वेळी chemical संपायला नको म्हणून हि धावपळ. काही वेळा पहिल्या प्राण्याने (बहुतांशी मीच तो प्राणी) चुकीची Chemical bottle उचलली कि मागच्या सगळ्यांना पण चुकीचं chemical मिळायचं. सगळा एक्सपेरिमेंट साफ चुकायचा - माझा आणि बाकीच्यांचा पण. लाज वाटली पाहिजे ना असं केल्याची (तसलं कधीच काही वाटलं नाही)!
Chemical हे bottle मधूनच ओतून घ्यायचो, pipette वगैरे भानगड आम्हाला आधी माहित नव्हती (ते Pharmacyला आल्यावर नीट समजलं).
कधी Titration चा एक्सपेरिमेंट असला तरच YC मध्ये pipette मिळायची. ती नक्की कशी वापरायची हे माहित नसल्यामुळे फार वैताग यायचा. एक solution घ्यायला आम्हाला २०-२० मिनिट्स लागायचे. Pipette ला पाठीमागे बोट किती लावायचं आणि किती उचलायचं हे तर अजिबातच जमायचं नाही. सगळं solution भलतीकडेच स्वाहा व्हायचं. Titration जेमतेम ५ मिनिटात उरकायचं पण हा सोलुशन एका flask मधून दुसऱ्या flask मध्ये घ्यायचा कार्यक्रम अर्धा पाऊण तास चालायचा. धन्य ते आम्ही आणि आमची लॅब!
Lab assistant हा रोज बायकोचा मार खाणारा प्राणी असावा असं मला नेहमी वाटायचं. रानगव्यासारखा तो आमच्याकडे बघायचा. मी तर माझ्या अतिउत्साहामुळे त्याचा अगणित वेळा ओरडा खाल्लाय. पण तेव्हा राग यायचा नाही तात्पुरतं वाईट वाटायचं. जरा वाईट वाटायचं पण नंतर आपलं Lab assistant कडेच बोट दाखवून आम्ही खीखी करायचो.
बारावीत सबमिशन च्या वेळेला आमचे केमिस्ट्री प्रॅक्टिकल चे सर जाम वैताग आणत होते. हे नीट लिहून आन, हा graph नीट काढ, हा slope चुकलाय, देवा देवा मला त्यांनी ३-४ वेळा तरी माघारी पाठवलं. मग सगळं नीट लिहून करेक्ट करून नेलं Journal एकदाचं सरांकडे. Checking करताना म्हणतायत, तुम्हाला असं वाटत असेल ना कि या मास्तर ला नरकात सुद्धा जागा नाही मिळणार मेल्यावर.
आता मी कसं सांगणार ना, कि हो सर असच वाटतंय!
Mastach... प्राणी...पण हा कोणता प्राणी म्हणायचा
ReplyDeleteहाहा 😁. अतिउत्साही विद्यार्थी प्राणी.
Delete😂😂😂👍🏻
ReplyDeleteआम्ही qualitative खूप छान करायचो... Madam बाहेर गेल्या की हळूच त्यांच्या वहीत बघायचो, नायतर त्यांना चिडवून irritate करायचो, मग त्या चुकून radicals सांगून द्यायच्या.... मग काय सरळ टीक टीक... सगळ्या टेस्ट positive... आणि त्यात lab assistant काका आणि मी RSS चे स्वयंसेवक त्यामुळे आपल्याला Lab assistant चा फुल सपोर्ट...आणि सगळ्यांची lab एकच असल्याने कुठे काय ठेवलंय सगळं कळायचं, शिक्षकांचा लाडका असल्याने lab ची आवरा आवर वगैरे मीच करायचो... मज्जा यायची...
ReplyDeleteलई भारी...तसं केमिस्ट्री आणि माझं कधीच जमलं नाही तुला चांगलच माहिती आहे.😂😂😂
ReplyDeleteआम्हाला तरी कुठली हौस होती एवढी 😂😂
Delete😂😂😂
Delete