Skip to main content

Posts

Showing posts with the label Anubhavlekhan

हापूस आणि मी!

हापूस आणि मी! एक जमाना होता, जेव्हा उन्हाळ्यात नखं पिवळी दिसायची (कावीळ नाही ओ) आंब्यांमुळे.  आत्तासुद्धा काही सुखी, श्रीमंत (सुखी असणे आणि श्रीमंत असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत बरं का!) घरांतील सदस्यांची नखे झाली असतीलच पिवळी. लाॅकडाऊन मध्ये सुद्धा त्यांनी ४-४ डझनाच्या हापूस आंब्याच्या पेट्या आणल्या असतील बरेचवेळा. आमच्या सारख्यांना आत्ता मे महिना संपल्यावर अर्धा डझन(च) आंबे विकत घेता आले. (पायपीट करणाऱ्यांना आणि मजूरांना यंदा तेही नशीबात नसेल अजून). असो. आम्ही पाऊस पडायला लागल्यावर बाजारात येणारे लोकल आंबे खाणार आहोत- आम्ही आत्मनिर्भर! (कोल्ह्याला द्राक्षे आंबट!) माझ्या लहानपणी, आम्ही गावाकडे रहायचो तेव्हा, पप्पांनी शेकड्याने देवगड हापूस विकत आणले होते - straight from Konkan!  तेव्हा असे १०० आंबे लोक विकत घेऊ शकत होते. (आता सामान्य माणूस सहज १०० आंबे विकत घेऊ शकला तर सामान्य माणसाचा 'विकास' झाला असं म्हणायचं! काय बरोबर ना? आता कुणीही offend होऊ नका, लगेच मिरची लागते राव तुम्हाला!) तर ते आणलेले आंबे घरात पिकत घातले होते. घरभर हापूस आंब्यांचा मस्त सुवास दरवळायचा. असं असताना स